मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; लॉकडाउनमध्ये 'या' गोष्टीचा फायदा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. बुधवारी (ता. २२) जिओ आणि फेसबुकची झालेली डील त्यांना फायदेशीर ठरली आहे. त्यांनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रिलायन्स जिओ-फेसबुक डील जाहीर झाल्यानंतर मुकेश अंबानीच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. जगात कोरोनाचे संकट आहे. आर्थिक घडी कोलमडत असताना रिलायंस ग्रुपसाठी ही एक चांगली आणि मोठी बातमी आहे. याआधी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अलिबाबाचे संस्थापक जॅक मा होते. गुरुवारी (ता. २२) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती ४ अब्ज डॉलरने वाढून ४९ अब्ज डॉलवर पोहोचली आहे.

Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

दरम्यान, करारापूर्वी २०२० मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत घसरण झाली होती. मार्चच्या सुरुवातीला जॅक मा यांच्याही संपत्तीत घसरण झाली होती. तरीही ते श्रीमंत यादीत अव्वल होते. त्याआधी अंबानी यांनी जॅक मा यांनी मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता. जॅक मा यांच्या तुलनेत अंबानी यांची संपत्ती ३ अब्ज डॉलरनी वाढली आहे. ब्ल्यूमबर्गच्या आकडेवारीनुसार (२१ एप्रिलपर्यंत) अंबांनी यांची संपत्ती १४ अब्ज डॉलरपर्यंत घसरली होती. तर, जॅक मा यांच्या एकूण संपत्तीत १ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambani tops Ma as Asias richest after deal with Zuckerberg