अमेरिकेत आढळणारा मासा गंगेच्या पाण्यात; नदीतील जलचरांना धोका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीत हा मासा आढळतो. गंगा नदीत इतर खंडातील समुद्री जीव आढळण्याची ही दुसरी घटना आहे.

वाराणसी - गंगा नदीतील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. गंगा नदीत डॉल्फिनच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांना नदीमध्ये सकरमाउथ कॅटफीश सापडला आहे. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीत हा मासा आढळतो. गंगा नदीत इतर खंडातील समुद्री जीव आढळण्याची ही दुसरी घटना आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांचे पथक यावर संशोधन करत आहे. संशोधकांनी 24 तास तपास केल्यानंतर कोणता मासा आहे याची ओळख पटवली.

वाराणसीमधील रमना इथल्या भागात गंगेच्या पात्रात सकरमाउथ मासा सापडला. जेव्हा हा विचित्र मासा पकडला तेव्हा तो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडे सोपवण्यात आला. बीएचयुच्या संशोधकांनी सांगितलं की, गंगेच्या पात्रात सापडलेला मासा हा मांसाहारी आहे. यामुळे गंगा नदीत आढळणाऱ्या जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर हे मासे वाढले तर गंगा नदी स्वच्छ ठेवणाऱ्या जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे गंगेचं पाणी अस्वच्छ होण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - साप, युवक आणि अजगराचा धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

गंगा नदीत मासा कुठून आला असा प्रश्न सध्या संशोधकांना पडला आहे. दरम्यान, संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की, घरात ठेवण्यात येणाऱ्या अँक्युरियममधून कोणीतरी हा मासा गंगा नदीत सोडला असावा. गंगा नदीत असे मासे सोडू नयेत असं आवाहन संशोधकांनी केलं आहे. तसंच पुन्हा असा मासा गंगा नदीत आढळला तर तो दुसऱ्यांदा नदीतच सोडू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american amezon sucker mouth catfish found in ganga river