esakal | महागाईचा भडका! नवदाम्पत्याला लग्नात भेट मिळाले कांदे, पेट्रोल, गॅस सिलेंडर
sakal

बोलून बातमी शोधा

Amid soaring fuel prices Tamil Nadu couple receive petrol gas cylinder and onions as wedding gifts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी सलग अकराव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.

महागाईचा भडका! नवदाम्पत्याला लग्नात भेट मिळाले कांदे, पेट्रोल, गॅस सिलेंडर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी सलग अकराव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, याच दिवशी तामिळनाडूमध्ये लग्नबंधनात अडकलेल्या एका नवदाम्पत्याला मित्रांनी कांदे, पेट्रोल आणि गॅस सिलेंडर भेट वस्तू म्हणून  दिले. या दाम्पत्यानं या भेटवस्तू स्विकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पतंजलीच्या ‘कोरोनील’नं एक कोटी लोक झाले बरे, रामदेवबाबा यांचा दावा

2200 लोकांनी पाहिला व्हिडिओ 

व्हिडिओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे मंडळी नवरा-नवरीला भेटवस्तू देताना दिसत आहेत. यामध्ये काही मित्रमंडळींनी भेटवस्तू म्हणून आपल्यासोबत पेट्रोलचा कॅन, गॅस सिलेंडर आणि काद्यांचा हार आणला होता. सध्याच्या घडीला अमुल्य असलेलं ही भेट या नवदाम्पत्यानं स्विकारली यावेळी भेट देणारे मित्रमंडळी फोटो काढण्यासाठी पोझ देताना दिसत आहेत. 45 सेकंदाची हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 2200 लोकांनी तो पाहिला आहे. 

भाजपाच्या युवा महिला नेत्याला अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक

हे खूपच महागडं गिफ्ट

या व्हिडिओवर कमेंट देताना एक युजर म्हणाला, "हे खूपच महागडं गिफ्ट आहे" त्याचवेळी एका युजरनं धोक्याचा इशारा देताना म्हटलं की, "नवदाम्पत्य आणि मित्र मंडळींनी पेट्रोल आणि गॅस सिलेंडर भेट देताना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ते अतिज्वलनशील आहे" 

पेट्रोलचा दरात 11व्या दिवशीही वाढ

चेन्नईमध्ये सध्या पेट्रोलचा दर 92.25 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलचा 85.63 रुपयांवर पोहोचलं आहे. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलनं पहिल्यांदाच 90 रुपयांचा दर पार केला. तर राजस्थानच्या श्री गंगानगर येथे बुधवारी पेट्रोलनं शंभरी गाठली. तसेच मध्य प्रदेशातील अन्नुपूर येथे गुरुवारी पेट्रोलच्या दरानं शंभरचा आकडा गाठला.