पतंजलीच्या ‘कोरोनील’नं एक कोटी लोक झाले बरे, रामदेवबाबा यांचा दावा

टीम ई सकाळ
Friday, 19 February 2021

विरोधाभासाची बाब म्हणजे  देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत लस घेणाऱ्याच्या यादीत खुद्द रामदेव बाबा यांच्या नावाचाही समावेश आहे.

कोविड-19 आजारावर पतंजलीनं आणलेल्या कोरोनील या औषधाबाबत बाबा रामदेव यांनी मोठा दावा केला आहे. या औषधामुळे तब्बल एक कोटी लोक बरे झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, विरोधाभासाची बाब म्हणजे  देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत लस घेणाऱ्याच्या यादीत खुद्द रामदेव बाबा यांच्या नावाचाही समावेश आहे. शुक्रवारी एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

डीसीजीआयनंही दिली कोरोनीलला परवानगी

पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे प्रमुख बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांनी मुलाखतीदरम्यान वैद्यकीय क्षेत्रात माफिया घुसले असल्याचाही दावा केला आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी हे पतंजलीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. म्हणजेच कोरोनीलवर जवळपास शिक्कमोर्तब झालंय का? या प्रश्नावर बालकृष्ण म्हणाले, “हो नक्कीच. गेल्यावेळी आम्ही सर्व नियमांचे पालन करत औषध बनवलं होतं. मात्र, संशोधन कागदपत्रांवर वेळ लागतो. त्यामुळे तेव्हा लोकांना चर्चेला वेळ मिळाला होता. त्यावेळी आम्हाला इम्युनिटी बुस्टर म्हणून परवानाही दिला गेला नव्हता. आता यालाच करोनाच्या औषधाच्या रुपात तसेच करोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधाच्या रुपात परवाना मिळाला आहे. याला ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची मंजुरीही मिळाली आहे.

नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला ‘त्या’ दहशतवाद्याची पुन्हा धमकी; म्हणाला...

वैद्यकीय क्षेत्रात ‘मेडिकल टेररिझम’

पत्रकार परिषदेत वापरलेल्या ‘मेडिकल टेररिझम’ या शब्दाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाळकृष्ण यांनी उत्तर देताना सांगितलं की, “वैद्यकीय क्षेत्रात काही माफिया घुसले आहेत. तर रामदेवबाबा म्हणाले, अनावश्यक औषध, अनावश्यक शस्त्रक्रिया आणि चाचण्या त्यांच्याकडून सांगितल्या जात आहेत. नवीन डॉक्टर जुन्या डॉक्टरांचे रिपोर्ट्सही पाहत नाहीत. रुग्णाला पुन्हा सर्व चाचण्या करायला सांगतात. यावर त्यांना 50 टक्के कमिशन मिळतं”

माफियांकडून रुग्णांना अनावश्यक सल्ले दिले जातात

मधुमेहासंदर्भात बोलताना बाबा रामदेव म्हणाले, “सुरुवातीला रक्तशर्करा 200 वर गेली तरी औषध दिलं जात होतं. आता हीच रक्तशर्करा 150वर गेली तरी इन्शुलिन सुरु केलं जातं. 100 लाख कोटींपेक्षा अधिक भारताचा जो जीडीपी आहे त्याच्या जवळपास जाणारा तर या औषध माफियांचा व्यवसाय आहे. डब्ल्युएचओचं म्हणणं आहे की, 90 टक्क्यांपर्यंत तर कंबरेच्या ऑपरेशनची गरजचं नसते. मात्र, तरीही याबाबत सल्ला दिले जातात. आम्ही मधुमेहानेग्रस्त असलेल्या लोकांना बरं केलं आहे.” विज्ञानाच्या नावावर अंधश्रद्धा कशासाठी पसरवता? असा सवालही त्यांनी या माफियांना केला.

जगातील पहिली फ्लाईंग कार उड्डाणासाठी सज्ज; अमेरिकेत FAAनं दिली परवानगी

एक कोटी लोक करोनीलनं झाले बरे

बाबा रामदेव यांनी यावेळी दावा केला की, “एक कोटी लोक तर कोरोनील औषध घेऊन बरे झाले आहेत. 25-30 कोटी लोक प्राणायाम आणि गुळवेल-तुळशीच्या काढ्यानेच बरे झाले आहेत. आम्ही कोणाशी तुलना करु इच्छित नाही. कारण या तुलनेमुळं आयुर्वेदाची महती कमी होईल. पण लसीकणाच्या यादीत शेवटच्या यादीत आम्ही आमचं नाव नोंदवलं आहे. तोपर्यंत तर करोना विषाणू सर्दी-पडशापेक्षाही कमजोर झालेला असेल. मात्र, आम्ही लसीकरण आणि अलोपॅथिच्या विरोधात नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Ramdev claims that Patanjali Coronil has cured one crore people