
Karnataka Politics
esakal
ठळक मुद्दे (Highlights)
सिद्धरामय्यांचा ठाम दावा – कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चेला उत्तर देत “मी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार” असे स्पष्ट केले.
शिवकुमार समर्थकांची मागणी – काही काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लवकरच मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दसरा-२०२५ उत्सवातील आश्वासन – ७७ वर्षीय सिद्धरामय्या यांनी पुढील दसऱ्यालाही ‘पुष्पार्चना’ सादर करण्याची आशा व्यक्त केली.
Political News Karnataka : ‘कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच मी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे,’ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. कुनिगलचे आमदार एच. डी. रंगनाथ यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे म्हटले होते. मी पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहीन, असे सिद्धरामय्या यांनी दसरा-२०२५ उत्सवानिमित्त म्हैसूर येथे पत्रकारांना सांगितले.