Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, आप आणि काँग्रेसशी संबंध असलेल्या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या टीमने ही कारवाई केलीय. सोमवारी आसाम पोलिसांनी म्हटलं होतं की, एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे.
Amit Shah
Amit Shah Sakal

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी पोलिस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेले दोघाही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाशी निगडीत असल्याचं सांगितलं जातंय.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी याच प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना हजर राहण्यास सांगितलं आहे. गृहमंत्र्यांनी वेगळंच विधान केलं होतं आणि व्हिडीओमध्ये भलतंच दाखवण्यात आलं होतं, असा आरोप रेवंथ रेड्डी यांच्यावर आहे.

दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना पाठवलेल्या समन्समध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजी हजर राहण्याचं नोटिशीमध्ये म्हटलं आहे. सोबत दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिटींशची ज्याचा संबंध आहे त्यालाही चौकशीसाठी घेऊन येण्याचं आदेशामध्ये म्हटलं आहे.

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, आप आणि काँग्रेसशी संबंध असलेल्या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या टीमने ही कारवाई केलीय. सोमवारी आसाम पोलिसांनी म्हटलं होतं की, एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव रीतोम सिंह असल्याचं सांगितलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप जिंकल्यानंतर एससी, एसटी यांचं आरक्षण संपवण्यबद्दल बोललं जात आहे. नंतर कळलं की शेअर होत असलेला व्हिडीओ एडिट करुन व्हायरल केला जात आहे.

वास्तविक हा व्हिडीओ २०२३ मधला तेलंगणा येथील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाषणामध्ये मुस्लिम कोटा संपवण्याबद्दल बोलत होते.

भापजपने याप्रकरणी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये खोळंबा घालण्यासाठी शाह यांचा व्हिडीओ डीप फेक करुन छेडछाड केला आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com