CAB : ईशान्येतील हिंसाचारावर अमित शहा यांनी केले भाष्य; म्हणाले...

पीटीआय
Monday, 16 December 2019

- झारखंडमधील सभेत अमित शहांचा घणाघात 

गिरीदीह (झारखंड) : नागरिकत्व कायद्यावरून कॉंग्रेस हिंसाचाराला चिथावणी देत असून, या कायद्यामुळे कॉंग्रेसच्या पोटात दुखू लागल्याचा घणाघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. या नव्या कायद्यामुळे ईशान्येकडील नागरिकांची संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर कसलाही परिणाम होणार नाही, केंद्रातील मोदी सरकार त्याचे संरक्षण करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. ते येथे आयोजित सभेत बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहा म्हणाले, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी याच मुद्यावरून काही दिवसांपूर्वी आपली भेट घेतली होती. मी त्यांना या समस्येवर तोडगा काढण्याचेही आश्‍वासन दिले होते. सध्या कॉंग्रेस पक्ष हिंदू- मुस्लिम राजकारण, नक्षलवाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देत आहे. याच पक्षाने तोंडी तलाकविरोधी कायदादेखील मुस्लिमविरोधी असल्याचा दावा केला होता.

आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

मोदींसारखा माणूस दहशतवादाला कठोर पद्धतीने सामोरे जात असताना कॉंग्रेसला मात्र तुष्टीकरण आणि मतपेढीचे राजकारण दिसते. आता नागरिकत्व कायद्याला कॉंग्रेस मुस्लिमविरोधी ठरवित आहे. प्रत्यक्षात हा कायदा मुस्लिमविरोधी नाहीच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Commented on Northeast Violence