गांधी कुटुंबासाठी गोवा फक्त पर्यटन स्थळ; अमित शहांचा खोचक टोला

पणजीत एका सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी टीका केली.
Rahul Gandhi Amit Shah
Rahul Gandhi Amit Shah Esakal
Updated on

गोवा: राज्यातील विधानसभा निवडणूका १४ फेब्रुवारी होणारआहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज (ता.३०) गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्याच्या (Goa) एकदिवसीय दौऱ्यावर आलेले अमित शहा यांनी घरोघरी प्रचार केला. यावेळी काँग्रेस पक्ष आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. गांधी कुटुंबासाठी गोवा फक्त पर्यटन स्थळ आहे असा खोचक टोला अमित शहा यांनी लगावला.

पणजीत एका सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले,गांधी कुटुंबासाठी गोवा फक्त पर्यटन स्थळ आहे. त्यांच्या मंत्र्यांना येथे सुट्या घालवायच्या आहेत. छोट्या राज्यांच्या विकासाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीलच सरकार प्राधान्य देत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी-फोबिया' आहे. येथील नागरीकांनी भाजपचा ‘गोल्डन गोवा’किंवा काँग्रेसचा ‘गांधी घराण्याचा गोवा’यापैकी एक पर्याय निवडावा असे आवाहन केले आहे.

गोव्यात विधानसभा निवडणूक लढवणारे इतर राज्यांचे राजकीय पक्ष येथे सरकार स्थापन करू शकत नाहीत. हे काम भाजपचे आहे. गोव्यातील ४० विधानसभा जागेसाठी विविध पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. राज्यात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com