esakal | ईशान्य भारतातील विकास कामावरुन अमित शहा यांची टीका 
sakal

बोलून बातमी शोधा

ईशान्य भारतातील विकास कामावरुन अमित शहा यांची टीका 

सध्या ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असून आज ते मणिपूरच्या दौऱ्यावर आले. विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 

ईशान्य भारतातील विकास कामावरुन अमित शहा यांची टीका 

sakal_logo
By
पीटीआय

इंफाळ - ईशान्य भारतात कॉंग्रेसने बराच काळ राज्य केले, परंतु या काळात केवळ भूमिपूजनच झाले, विकासकामे कोठेच दिसले नाही, अशी टीका आज गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते सध्या ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असून आज ते मणिपूरच्या दौऱ्यावर आले. विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमित शहा म्हणाले, की कॉंग्रेसने दीर्घकाळ ईशान्य भारतातील राज्यांवर राज्य केले आहे. त्यांनी या भागातील दहशतवाद्यांशी आणि गटांशी कधीही चर्चा केली नाही. नागरिक अकारण मारले जात होते आणि विकासाचा थांगपत्ता नव्हता. विकासाच्या नावावर केवळ भूमिपूजन केले जात होते. परंतु आमच्या काळात केवळ भूमिपूजन नाही तर प्रकल्पाचे उद्घाटन देखील होत आहेत. ईशान्य भारताची ओळख आता बदलत चालली आहे. पूर्वी हिंसाचार आणि दहशतवादी घटनांमुळे ईशान्य भारताची प्रतिमा खराब झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात सातत्याने बंदचे आवाहन केले जात होते आणि विकास कामातही अडथळे आणले जात होते. परंतु गेल्या सहा महिन्यात दहशतवादी संघटनांनी प्रशासनासमोर शरणागती पत्करत आहेत. आगामी काळात हिंसाचाराच्या घटनांत आणखी घट होऊ शकते. स्थानिक नागरिकांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, अशीही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडे सहा वर्षात ईशान्य भारताच्या विकासाची गंगा आणली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मूळ नागरिकांसाठी इनर लाइन परमिटची मागणी करणारे मणिपूरचे लोक कालांतराने ही मागणी विसरून गेले होते. परंतु इनर लाइन परमिट मणिपूरला न दिल्यास स्थानिक रहिवाशांवर अन्याय केल्यासारखे होईल, असा विचार पंतप्रधानांनी केला आणि २०१९ मध्ये त्यांनी मागणीची वाट न पाहता इनर लाइन परमिट देण्याचे काम केले, असे शहा म्हणाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विविध विकास कामांचे उद्घाटन 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज सकाळी मणिपूर येथे आगमन झाले. या वेळी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. शहा यांनी राज्यातील अनेक विकास कामांचे अनावरण केले. त्यात चौराचंदपूर मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन, इंफाळ येथील सरकारी गेस्ट हाऊसचे उद्घाटन, राज्य पोलिस मुख्यालय आदींचा त्यात समावेश आहे. तत्पूर्वी गुवाहटी येथे कामाख्य मंदिरात अमित शहा यांनी पूजा केली. या वेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, आरोग्य मंत्री हेमंत बिस्वा उपस्थित होते. यानंतर त्यांनी आसाम राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. 

loading image