esakal | चीनची पहिल्यांदाच कबुली; गलवान खोऱ्यात 5 जवान मारले गेले, नावे केली जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

galwan

या घटनेमध्ये भारताचे 20 जवान शहिद झाले होते. 

चीनची पहिल्यांदाच कबुली; गलवान खोऱ्यात 5 जवान मारले गेले, नावे केली जाहीर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या दरम्यान गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुरवातीपासूनच तणावाचे वातवारण आहे.  तो तणाव आता कमी व्हायला सुरवात झाली आहे. लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनेक बैठकांअंती आता पूर्व  लडाखमधील भारत आणि चीनच्या सैन्याने आता मागे हटण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. तर आता चीनने  पहिल्यांदाच गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या सैन्याच्या झटापटीत त्यांचे देखील सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे. या रक्तरंजीत धुमश्चक्रित चीनचे पाच सैनिक मारले गेल्याची माहिती चीनने दिली आहे. या घटनेमध्ये भारताचे 20 जवान शहिद झाले होते. 

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल  टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाने काराकोरम पर्वतावर तैनात राहिलेल्या पाच चीनी सैनिकांच्या बलिदानाची आठवण काढली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे शिनजियांग मिलिट्री कमांडचे रेजीमेंटल कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन अशी या पाच सैनिकांची नावे आहेत. 

हेही वाचा - फेसबुकने दिला यूजरना धक्का

गलवान घाटीतील झटापटीनंतर 50 चीनी सैनिकांना वाहनांद्वारे नेण्यात आल्याची माहिती होती. या हल्ल्यात चीनचे अनेक सैनिक मारले गेले होते. तसेच जखमीही होते. मात्र, चीन या दाव्यास मानण्यास तयार नाहीये. 

loading image