WhatsApp ने पुन्हा लावल्या अटी; युजरने अपडेट स्वीकारावेत यासाठी नवीन शक्कल

WhatsApp Privacy Policy
WhatsApp Privacy Policy

नवी दिल्ली : भारतामध्ये आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला लागू करण्यासाठी व्हॉट्सअपने एक नवी मोहीम जाहीर केली आहे. तसेच यावेळी व्हॉट्सअपने नव्या पॉलिसीला वाचून ती स्विकारण्यासाठी काही वेळ देखील दिला आहे. नव्या मोहीमेमध्ये व्हॉट्सअपने पॉलिसीसंदर्भात छोट्या बॅनरचा वापर केला आहे जो चॅट लिस्टच्या वर दिसेल आणि युझर्सला पर्याय देईल. 

काय आहे नवी मोहीम :
1. चॅटच्या सर्वात वर एक नवे डॉक्यूमेंट येईल. आम्ही आमचे नियम-अटी तसेच प्रायव्हसी पॉलिसी बदलत असून ती वाचण्यासाठी क्लिक करा, असं त्यावर लिहलेलं असेल.
2. ते उघडल्यावर नवा बॅनर उघडेल. यामध्ये व्हॉट्सअपने पहिल्यांदाच हे स्पष्ट केलंय की आम्ही तुमचे मॅसेजेस वाचत नाही तसेच पाहतही नाही. आम्ही आपल्या प्रायव्हसीचा आदर करतो.
3. मात्र, बिजनेसेसबाबतचे चॅटचे पर्याय आम्ही आणखी सोपे करत आहोत. हे बदल तुम्हाला सांगणे आमचं कर्तव्य आहे, असं व्हॉट्सअपने म्हटलंय. 
4. त्यानंतर नवे अपडेट कसे असणार आहे. याबाबतची माहिती दिली आहे. या सगळ्यात कुठेही आम्ही आमच्या प्रायव्हसी  पॉलिसीत बदल करणार नसल्याचं व्हॉट्सअपने पुन्हा स्पष्ट केलंय. त्यानंतर हे नवे अपडेट स्विकारण्याचा पर्याय दिला आहे. 

15 मार्च असेल नवी मर्यादा
व्हॉट्सअपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला स्विकारण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2021 देण्यात आली होती. मात्र, त्यावरुन झालेल्या वादानंतर व्हॉट्सअपने ही मर्यादा वाढवून आता ती 15 मार्च 2021 केली आहे. याचा अर्थ ही नवी पॉलिसी 15 मार्चनंतर अंमलात  आणण्यात येईल. त्यानंतर जे हे अपडेट स्विकारणार नाहीत त्यांना व्हॉट्सअप वापरता येणार नाही. 

याआधी व्हॉट्सअपला फटका
गेल्या महिन्यातच व्हॉट्सअप आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेकांनी व्हॉट्सअप सोडून सिग्नलसारखे ऍप वापरण्याचा निर्णय घेतला होता. याचा व्हॉट्सअपला फटका आणि इतर मेसेजिंग ऍपला फायदा झाला होता. अनेक युझर्सनी व्हॉट्सअपबाबत नाराजी व्यक्त करत ते सोडण्यास सुरवात केली होती. याचा परिणाम असा झाला की, सिग्नलसारखे मॅसेजिंग ऍप भारतात टॉप मोफत ऍपच्या यादीत पहिल्या स्थानावर देखील पोहोचला. 

गेल्यावेळेला व्हॉट्सएपने युझर्सला नवी पॉलिसी स्विकारण्यासंदर्भात दोनच पर्याय सोडले होते. एकतर युझरने पॉलिसीला स्विकारावं अन्यथा हा प्लॅटफॉर्म सोडून द्यावा. आताही तसंच आहे मात्र, यावेळच्या अपडेटनुसार व्हॉट्सअर युझरला पुरेसा वेळ देत आहे. जेणेकरुन युझरने नव्या पॉलिसीला योग्यरितीने वाचावं आणि समजून घेऊनच स्विकारावं. 

याआधी व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन झालेल्या वादानंतर चार स्टेट्स ठेवून आपलं स्पष्टीकरण युझरपर्यंत पोहोचवलं होतं. मात्र, आताच्या नव्या मोहीमेमध्ये अगदी चॅटच्यावर आपल्याला एक डॉक्यूमेंटसारखे चॅट दिसेल. ते उघडल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपच्या पॉलिसीबाबत माहिती मिळेल. या पॉलिसीमध्ये स्पष्टरित्या लिहण्यात आलं आहे की, व्हॉट्सअप आपली खाजगी माहिती वाचत नाही तसेच ती बघतही नाही. आमची सिस्टीम एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे आणि व्हॉट्सअप कंपनी आपल्या या प्रायव्हसीबाबत प्रतिबद्ध आहे. त्यात तडजोड होणार नसल्याचं व्हॉट्सअपने स्पष्ट केलंय.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com