Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य शिवकुमार अंबाला, अस्मा तस्लीम, सतीश मन्ने आणि नवीन पेटेम यांना १ मे रोजी पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे.
Amit Shah
Amit Shah esakal

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं बनावट व्हिडीओचं प्रकरण सध्या देशात गाजत आहे. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना नोटिस पाठवली आहे. त्यांच्यासह सात राज्यातील १६ नोत्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात राजस्थान, झारखंड, नागालँड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात तपास सुरु केला आहे. पोलिस या राज्यांमध्ये पोहोचले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे एक लोकसभा उमेदवार, राजस्थान आणि नागालँडमध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांनाही मोबाईल फोनसह पोलिसांसमोर हजर होण्यास सांगण्यात आलेलं आहे.

सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य शिवकुमार अंबाला, अस्मा तस्लीम, सतीश मन्ने आणि नवीन पेटेम यांना १ मे रोजी पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे.

Amit Shah
Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी रविवारी भाजप आणि गृह मंत्रालयाकडून तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिस स्पेशल सायबर विंगचे आयएफएसओ युनिटनेही एफआयआर दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com