Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

South Mumbai constituency: दुसरीकडे यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत बंडखोरी केली. यामुळे ईडीच्या कारवाईतून सुटका व्हावी यासाठी त्यांनी ठाकरेंना सोडले असे आरोप होत असतात.
Yamini Jadhav|South Mumbai constituency
Yamini Jadhav|South Mumbai constituencyEsakal

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. नुकतेच शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. (South Mumbai constituency Lok Sabha Election 2024)

महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरल्यामुळे या जागेवरून पेच निर्माण झाला होता. मात्र, आता आमदार यामिनी जाधव यांच्या नावची घोषणा झाल्याने दोन्ही पक्षातील रस्सीखेच संपल्याचे स्पष्ट झाले.

'ईडी'कडून चौकशी

आमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईची उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी शिवसेना फुटण्यापूर्वी त्यांचे पती यशवंत जाधव यांची ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप होत होता.

मुंबईतील भायखळ्याच्या आमदार असेलेल्या यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. फेमाच्या कथित उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात ईडी त्याच्याविरुद्ध चौकशी करत आहे.

ईडीच्या तपासापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली जाधव कुटुंबाची वांद्रे येथील एक फ्लॅट आणि यशवंत यांच्या जवळपास 40 मालमत्ता जप्त केल्या होत्या.

Yamini Jadhav|South Mumbai constituency
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

अरविंद सावंत लढत

यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्यासमोर दोन टर्मचे खासदार अरविंद शिंदे यांचे आव्हान असणार आहे.

शिवसेना फुटल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साठ देत ठाकरेंशी निष्ठावंत असल्याचे दाखवले.

दुसरीकडे यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत बंडखोरी केली. यामुळे ईडीच्या कारवाईतून सुटका व्हावी यासाठी त्यांनी ठाकरेंना सोडले असे आरोप होत असतात.

Yamini Jadhav|South Mumbai constituency
Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

दरम्यान देशभरात यंदाची लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होणार असून, महाराष्ट्रातही 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील अंतिम आणि पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

यंदा या मतदारसंघात दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून लढत असले तरी ते मूळ शिवसैनिकच आहेत. त्यामुळे यात कोणता सैनिक बाजी मारतो हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com