

Amit Shah’s FCRA Bill Move Triggers Opposition Push in Lok Sabha
esakal
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षामुळे गाजण्याची शक्यता आहे. परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक अर्थात एफसीआरए विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी दुपारी आपल्या सर्व लोकसभा खासदारांसाठी व्हीप जारी करून १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी सभागृहात अनिवार्य उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.