esakal | 'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्यक्त केल्याने 'मोदी रोजगार दो' नावाचा एक हॅश्टॅग ट्रेंड झाला होता.

'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्यक्त केल्याने 'मोदी रोजगार दो' नावाचा एक हॅश्टॅग ट्रेंड झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शहा यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

हेही वाचा - हयगय नाही! हत्येप्रकरणी कोंबड्याला झाली अटक; कोर्टात होणार सादर

यावेळी त्यांनी म्हटलंय की, जर तरुणांनी एनडीएला मतदान केलं तर त्यांचं सरकार केंद्र शासित प्रदेशातील बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांनी कमी करेल. यावेळी शहा यांनी असाही आरोप केला आहे की, पुदुच्चेरीमध्ये आधीच्या काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या योजनांच्या बाबतीत अत्यंत तुच्छ राजकारण केलं आहे. 

शहा यांनी म्हटलं की, पुदुच्चेरीमध्ये पुढील सरकार हे एनडीएचं होणार आहे. फक्त पुदुच्चेरीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील होत आहेत. कारण काँग्रेस पक्षामध्ये पात्रतेला काहीही किंमत दिली जात नाही. 

हेही वाचा - Mann Ki Baat : 'जगातील सर्वांत प्राचीन तमिळ भाषा शिकू न शकणे ही माझी कमतरता'

शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी विचारलं होतं की, मत्स्य विभाग देशात का नाही आहे? मी लोंकाकडून जाणून घेऊ इच्छितो की त्यांना असा नेता हवाय का ज्याला हे देखील माहिती नाहीये की, मत्स्य विभाग गेल्या 2 वर्षांपासून देशात अस्तित्वात आहे. पुढे त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं की, हे काँग्रेसचे नेते सुट्टीवर होते तेंव्हाच केंद्रातील एनडीए सरकारने 2019 मध्ये या मंत्रालयाची स्थापना केली होती.

loading image