Mann Ki Baat : 'जगातील सर्वांत प्राचीन तमिळ भाषा शिकू न शकणे ही माझी कमतरता'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

येत्या काही आठवड्यांवरच तमीळनाडूतील विधानसभेच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं. या मनोगतात ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तसेच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत देशवासीयांशी संवाद साधतील अशी शक्यता होती.

हेही वाचा - आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट 

आजच्या मन की बातमध्ये मोदींनी अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. यामध्ये येऊ घातलेल्या अनेक घटनांचा उल्लेख होता. या मन की  बातमध्ये मोदी म्हणाले की, जगातील सर्वांत प्राचीन भाषा तमिळ मला शिकायची होती. ती शिकण्याचा प्रयत्न करुनही मला ती शिकता आली नाही. ही माझ्यातली कमी आहे.  जलसंवर्धनाबाबत आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. येत्या काही दिवसांतच जल शक्ती मंत्रालयाद्वारे 'Catch the Rain' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. 'Catch the Rain, where it falls, when it falls' असं या मोहीमेचं घोषवाक्य आहे. 

पुढे ते म्हणाले की, आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. वैज्ञानिक सीव्ही रमन यांच्या 'रमन इफेक्ट'च्या शोधाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. भारतातील युवकांनी अशा संशोधकांबद्दल तसेच संशोधनाच्या इतिहासाबद्दल भरपूर वाचलं  पाहिजे. आत्मनिर्भर भारत मोहीमेमध्ये विज्ञानाचे योगदान मोठं आहे. लॅब टू लँड या मंत्रासह आपल्याला विज्ञानाला पुढे नेलं पाहिजे. मला आनंद आहे की सध्या आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र देशातील गावागावापर्यंत पोहोचतो आहे. जेंव्हा देशातील प्रत्येक देशवासी स्वदेशी गोष्टींवर गर्व करतो तेंव्हा आत्मनिर्भर भारत फक्त एक आर्थिक अभियान न राहता ते एक नॅशनल स्पिरीट बनतं. याच स्पिरीटने लडाखचे उरगेन फुत्सौंग देखील काम करत आहेत. उरगेनजी एवढ्या उंचीवर देखील ऑर्गॅनिक आणि सायक्लिक पद्धतीने शेती करत जवळपास 20 पिकं घेत आहेत, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा - Corona : देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

माघ महिन्यात आणखी एका गोष्टीची चर्चा होते ते म्हणजे संत रविदास जी यांची. माझं हे भाग्य आहे की मी संत रविदासजींच्या जन्मस्थळाशी म्हणजेच वाराणसीशी निगडीत आहे, असं मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mann ki baat pm narendra modi 74 th session 28 February