नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करत इंग्रजीच्या वर्चस्वावर थेट प्रहार केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'भारतात असा दिवस लवकरच येईल, जेव्हा इंग्रजी (English in India) बोलणे लाजीरवाणे मानले जाईल आणि देशातील नागरिक आपल्या मातृभाषांचा अभिमान बाळगतील.'