esakal | अमित शहा देशाचे पहिले सहकार मंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

अमित शहा देशाचे पहिले सहकार मंत्री

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज रात्री नवीन मंत्रिमंडळाच्या (New Mantrimandal) खातेवाटपाची घोषणा केली. त्यानुसार देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची (Cooperation Minister) जबाबदारी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे देण्यात आली आहे. केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांच्याकडे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री १०च्या पुढे नवीन मंत्र्यांच्या मंत्रालयाची घोषणा केली. (Amit Shah is the Indians First Cooperation Minister)

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे अतिप्रिय असलेले रेल्वे मंत्रालय बदलून त्यांना स्मृती इराणी यांच्याकडे यापूर्वी असलेल्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे हलवण्यात आले आहे. रेल्वेखाते आता ओडिसाचे खासदार अश्विनी चौबे यांच्याकडे देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना कॅबिनेटपदी बढती देताना त्यांना मोदींनी क्रीडा मंत्रालयातच ठेवले आहे. युवक कल्याण खातेही त्यांच्याकडे देण्यात आले आहे.

हेही वाचा: मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्य मंत्री; जाणून घ्या इतर खाती कोणाकडे?

ज्योतिरादित्य शिंदे यांना अत्यंत महत्वाचे समजले जाणारे मुलकी विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे आणि सेंट्रल विस्टा या वादग्रस्त प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे हरदीपसिंग पुरी यांना तेथेच ठेवून त्यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे समर्थक असलेले पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे डेअरी आणि मत्स्योद्योग मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. दिल्लीतील तेजतर्रार भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांना सांस्कृतिक मंत्रालयाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्याबरोबरच मोदी यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपद बहाल केले आहे.

बिहारचे खासदार गिरिराज सिंग यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालय देण्यात आले आहे. कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार होता. रामविलास पासवान यांचे बंधू आणि लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पाडणारे पशुपती पारस यांना अन्न प्रक्रिया मंत्रालय देण्यात आले आहे . भाजपा आघाडीला टाटा बाय-बाय शेतकरी प्रश्नावरून करणाऱ्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांच्याकडे यापूर्वी हे खाते होते.

हेही वाचा: मोदींच्या मेगा कॅबिनेटमध्ये नारीशक्तीचा गौरव!

नवे मंत्री, नवी जबाबदारी

  • मनसुख मांडविया - आरोग्यमंत्री होणार

  • धर्मेंद्र प्रधान - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी (कौशल्यविकास मंत्रालयही त्यांच्याकडेच)

  • अश्विनी वैष्णव - रेल्वेमंत्री होणार

  • पियुष गोयल - वस्त्रोद्योग मंत्रालय

  • हरदीप सिंग पुरी - नगर विकास मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय

loading image