esakal | मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री; जाणून घ्या इतर खाती कोणाकडे?
sakal

बोलून बातमी शोधा

Mansukh Mandviya

मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्य मंत्री; जाणून घ्या इतर खाती कोणाकडे?

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला, यावेळी ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, केंद्रातील महत्वाचं आरोग्य खातं ज्यांच्याकडे होतं त्या डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे खात कोणाकडे जाईल याची उत्सुकता होती. त्यानुसार, मनसुख मांडवीय हे आता देशाचे नवे आरोग्य मंत्री असतील. तसेच रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राज्यातील चार मंत्र्यांकडे असेल 'ही' जबाबदारी

राज्यातील चार नेत्यांना नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून यांपैकी नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. भागवत कराड यांच्याकडे अर्थराज्य मंत्रीपद तर भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

नव्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेली महत्वाची खाती

१) आरोग्य, रसायन आणि खते - मनसुख मांडवीय

२) रेल्वे - अश्विनी वैष्णव

३) नागरी उड्डाण मंत्रालय - ज्योतिरादित्य शिंदे

४) कायदा आणि न्याय - किरन रिजिजू

५) माहिती आणि प्रसारण - अनुराग ठाकूर

जाणून घ्या संपूर्ण यादी -

loading image
go to top