esakal | दिल्लीत पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

Modi, Shah

दिल्लीत पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मागच्या आठवडाअखेरीस २५ भाजपा खासदार आणि मंत्र्यांची भेट घेतली. मोदी सरकारच्या (modi govt) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक केली. गुजरात, उत्तर प्रदेशसह (uttar pradesh) वेगवेगळ्या राज्यातील खासदार शनिवारी-रविवारी अमित शाह यांच्या निवासस्थानी आले होते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (Amit Shah met 25 BJP MPs amid talks of Union Cabinet expansion)

उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील खासदारांची अमित शाहंनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी मागच्या दोन वर्षातील सरकारचं कामकाज कसं चाललं आहे? त्या बद्दल त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडूनही आढावा घेतला. केंद्रासमोर कुठल्या अडचणी आल्या, त्यावरही सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

हेही वाचा: शिवसेनेने हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी - राम कदम

पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीला राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डीव्ही सदानंद गौडा आणि व्ही. मुरलीधरन हे मंत्री उपस्थित होते. ही पाचवी बैठक होती. मोदींनी शुक्रवारी अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबतही चर्चा केली. पुढच्यावर्षी काही राज्यांमध्ये खासकरुन उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात काही फेरबदल, खातेबदल केले जाऊ शकतात.

हेही वाचा: मराठी अभिनेत्याच्या अटकेवरुन भातखळकर संतापले, शिवसेनेवर प्रहार

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीमध्ये मोदींकडून वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला गेल्याची चर्चा आहे. तसंच इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये सरकारच्या कामगिरीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत मोदींनी जाणून घेतल्याचंही म्हटलं जात आहे.

loading image