Gujrat Riots: मोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केलं - अमित शाह

गुजरात दंगलीप्रकरणी झालेल्या आरोपांमुळे पंतप्रधान मोदींनी खूप दुःख सहन केलंय, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSakal

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणी करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. नुकतीच नरेंद्र मोदींच्या क्लिनचिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये त्यांची क्लिनचिट कायम ठेवण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. तसंच नरेंद्र मोदींवरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. (Amit Shah on Narendra modi gujarat riots)

एका मुलाखतीत बोलताना अमित शाह (Home Minister Amit Shah) म्हणाले की, १८-१९ वर्षांची ही लढाई आहे. देशाचा एवढा मोठा नेता एक शब्द न बोलता सगळ्या दुःखांना भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे विषप्राशन केलं, त्याप्रमाणे गिळून, सहन करुन लढत राहिला. आज मोदींचं नेतृत्व सोन्यासारखं झळाळून निघालं. मोदींचं दुःख मी जवळून पाहिलंय. या आरोपांना सहन करताना पाहिलं आहे. आपली बाजू सत्य असतानाही केवळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत. असं कोणीतरी खंबीर मनाची व्यक्तीच करू शकते.

Narendra Modi
Live मुलाखतीतच अमित शाह म्हणाले, "..हा बोलण्याचा विषय नाही"

गुजरात दंगलप्रकरणी मोदींवर (narendra modi Gujrat riots) झालेले आरोप राजकीय सूडातून झालेले आहेत, असं विधानही अमित शाह यांनी केले आहेत. काही NGO, काही विशिष्ट विचारधारा असलेले पत्रकार यांनी पंतप्रधान मोदींवर खोटे आरोप लावले, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले, त्यांनी आता मोदींची माफी मागावी. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com