एका युगाचा अंत; बाबासाहेब पुरंदरेंना अमित शहांची मराठीतून श्रद्धांजली | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका युगाचा अंत; बाबासाहेब पुरंदरेंना अमित शहांची मराठीतून श्रद्धांजली

एका युगाचा अंत; बाबासाहेब पुरंदरेंना अमित शहांची मराठीतून श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. सकाळी पाचच्या सुमारास त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णलयात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या जाण्याने झालेलं दु:ख हे शब्दांच्या पलिकडचे आहे असं म्हणत श्रद्धांजली वाहिली. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीतून ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. एका युगाचा अंत झाल्याची भावना अमित शहांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

अमित शहा ट्विटरवर म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली.

काही वर्षांपूर्वी पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांची ऊर्जा व विचार प्रेरणादायी होते. आज त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचे कुटुंबीय व प्रशंसकांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. आई भवानीच्या चरणी त्यांना चिरशांती लाभो अशी प्रार्थना अमित शहा यांनी केली.

loading image
go to top