उत्तर प्रदेशमध्ये रोड रोमिओविरोधी पथक स्थापणार; शहांचे आश्वासन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मेरठ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील मुलींच्या सुरक्षेसाठी रोमिओविरोधी पथकांची स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील मुलींच्या सुरक्षेसाठी रोमिओविरोधी पथकांची स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान मेरठ येथील एका सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, 'राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत कमकुवत आहे. येथे कोणालाही कोणाची भीती वाटत नाही. त्यामुळे दुष्टांची नजर मुलींवर पडत आहे. मात्र, आमच्यावर विश्‍वास ठेवा. आम्ही सत्तेत आल्यानंतर मुलींना सुरक्षा पुरवून त्यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांचे पावित्र्य राखले जाईल. मुलींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक महाविद्यालयाला रोमिओविरोधी पथक पुरविण्यात येईल. या पथकांमुळे मुलींना कोणत्याही भीतीशिवाय महाविद्यालयात वावरता येईल.'

यावेळी शहा यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लक्ष्य करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याची टीका केली. ते म्हणाले, 'उत्तर प्रदेशमध्ये एका दिवसात 13 हत्या आणि दररोज साधारण 21 ते 24 बलात्कार होतात.' कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत 'हे दोघे उत्तर प्रदेशला उध्वस्त करतील', अशी टीका शहा यांनी केली.

Web Title: Amit Shah promises anti-Romeo squad to protect girls