'या' तीन राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनवा- अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनवण्याचं आवाहन केलं आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनवण्याचं आवाहन केलं आहे. दक्षिणी राज्य हा भाजपचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तेलंगणात पक्षाच्या सदस्य मोहिमेदरम्यान अमित शाह बोलत होते. 

कर्नाटकमध्ये आम्ही सरकार बनवलं होतं, तरीही म्हटलं जातं भाजप दक्षिणेत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, तेलंगणा, आंध्र प्रदेश असो वा केरळ, या तिन्ही राज्यांना एक दिवस भाजपचा गड बनवावा लागेल. पहिल्यांदा तेलंगणाला आपला गड बनवयाचा की आंध्र प्रदेश आणि केरळला याचा निर्णय तुम्हीच घ्या, असेही शहा म्हणाले.

या राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. दक्षिण भारतात कर्नाटक सोडल्यास भाजपला तेलंगणामध्ये फक्त 19 टक्के मतं मिळाली आहेत. पुढच्या निवडणुकीत भाजपला या राज्यांतून 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळालीच पाहिजेत, असा निर्धारही त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah said to party workers make the bjp stronghold in telangana andhra pradesh and kerala