"फक्त जनगणनाच विकास अन् SC/ST ची नेमकी स्थिती काय ते सांगू शकेल" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah says Only census can tell the exact status of development and sc and st

"फक्त जनगणनाच विकास अन् SC/ST ची नेमकी स्थिती काय ते सांगू शकेल"

आसाम सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर आहेत, या भेटीदरम्यान गृहमंत्री शहा यांनी जनगणना कार्यालयाचे (Census Office) उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशाचे धोरण ठरवण्यात जनगणनेचे महत्व आधोरेखीत करत त्यासंबंधी नवीन घोषणा देखील केल्या.

गृहमंत्री म्हणाले की, देशात विकासाची स्थिती काय आहे ते केवळ जनगणनाच सांगू शकते. तसेच एससी आणि एसटी आणि डोंगराळ भाग, शहरे आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली कशी आहे ते जनगणनेतून लक्षात येते, असे अमित शहा म्हणाले.

गृह मंत्रालयाने जनगणना अधिक शास्त्रोक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल, जी 100% परिपूर्ण जनगणना असेल असे देखील केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. जन्मानंतर, तपशील जनगणना रजिस्टरमध्ये जोडला जाईल आणि तो/ती 18 वर्षांचा झाल्यानंतर, नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल आणि मृत्यूनंतर, नाव हटवले जाईल. यामुळे नाव/पत्ता यामध्ये बदल करणे आणखी सहज होईल, ते सर्व एककत्र जोडले जाईल, अशी माहिती देखील शहा यांनी दिली.

हेही वाचा: 'रुपयाची घसरण निर्यातीसाठी चांगली, पण..'; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

जन्म आणि मृत्यू नोंदणी देखील जनगणनेशी जोडली जाईल. 2024 पर्यंत, प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाईल म्हणजे आपली जनगणना आपोआप अपडेट होईल असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी पुढील ई-जनगणना पुढच्या 25 वर्षांच्या धोरणांना आकार देईल. सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यावर सर्व तपशील ऑनलाइन भरणारे मी आणि माझे कुटुंब पहिले असू अशी माहिती देखील शहा यांनी दिली आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती

Web Title: Amit Shah Says Only Census Can Tell The Exact Status Of Development And Sc And St

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AssamAmit Shah
go to top