'रुपयाची घसरण निर्यातीसाठी चांगली, पण..'; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

rahul gandhi say falling rupee is good for exports over rupee hit all time low
rahul gandhi say falling rupee is good for exports over rupee hit all time low

विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय चलनाची मोठी पडझड झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाने सर्वांत मोठी घसरण नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत, मोदीजी, तुम्ही रुपया घसरला की मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत. आता रुपया आजपर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर पोहचला आहे. पण त्यासाठी मी तुमच्यावर डोळे झाकून टीका करणार नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.

तसेच त्यांनी त्यामाचे कारण देखील सांगितले, ते म्हणाले की, जर आपण निर्यातदारांना भांडवलाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आणि नोकऱ्या निर्माण करण्यात मदत केली, तर निर्यातीसाठी ही रुपयाची घसरण चांगली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पुढे गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करा, मीडियामधील हेडलाईन्सवर नाही, असा टोलाही यावेळी लगावला.

rahul gandhi say falling rupee is good for exports over rupee hit all time low
केंद्र सरकार राजद्रोहाच्या कलमाबाबत पुनर्विचार करणार; सुप्रीम कोर्टात माहिती

दरम्यान सोमवारच्या सुरूवातीच्या सत्रात भारतीय चलन 52 पैशांनी घसरून तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत 77.42 वर पोहोचली आहे. ही आत्तापर्यंतची भारतीय चलनाची सर्वांत मोठी घसरण आहे.

परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.17 वर उघडला होता आणि नंतर 77.42 पर्यंत घसरला, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 52 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 55 पैशांनी घसरून 76.90 वर बंद झाला.

rahul gandhi say falling rupee is good for exports over rupee hit all time low
बारावीचा 10 तर, दहावीचा निकाल 20 जूनला; बोर्डाची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com