...म्हणून मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणतात : अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : राजकारण कसे असावे आणि ते कसे करावे हे चाणक्यांकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) केले. तसेच राजामध्ये कोणताही देविक अंश नसून, राजा हा संविधानाचा प्रथम सेवक असतो. हे आर्य चाणक्य म्हणाले होते. आज मी नरेंद्रभाई यांच्या तोंडून ऐकतो, की मी पंतप्रधान नसून, प्रधानसेवक आहे. बहुतेक त्यांनी चाणक्य यांना वाचले असावे, असेही अमित शहा म्हणाले. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे :
 
- राजा राज्याचा प्रथम सेवक आहे, याची सुरवात चाणक्यांनी केली.

- राजा संविधानाचा प्रधानसेवक आहे.

- आज मी नरेंद्रभाई यांच्या तोंडून ऐकतो, की मी पंतप्रधान नसून, प्रधानसेवक आहे. बहुतेक त्यांनी चाणक्य यांना वाचले असावे.

- सात विभागांमध्ये राज्याची विभागणी केली गेली.

- सिंकदराच्या हल्ल्यानंतर चाणक्यांची भूमिका महत्वाची.

- त्यानंतर शासनव्यवस्था, आर्थिकव्यवस्था मजबूत होती.

- एक हजार वर्षांपर्यंत त्यांनी बनवलेले राष्ट्र अविरतपणे कार्यरत होते. 

- त्यावेळी भारत अत्यंत सुरक्षित होता.

- चाणक्यांनी दीर्घकाळात देशाची सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली.

- जगाच्या जीडीपीमध्ये भारताचा जीडीपी महत्वाचा होता.

- राष्ट्राला सुरक्षित करण्याचे चाणक्यांनी मोठे योगदान दिले.

- भारताचे योगदान 20 टक्क्यांपेक्षा कमी नाही.

- राष्ट्र मजबूत तर राजा सुरक्षित असतो.

- राष्ट्र महान है, राजा महान नही, असे प्रतिपादन आर्य चाणक्य यांनी केले होते.

- शिक्षक बनून सम्राट बनण्याचे काम आर्य चाणक्य यांनी केले.

- आर्य चाणक्य यांच्यावेळी जगाच्या जीडीपीमध्ये भारताचा वाटा 35 % होता. 

- चाणक्य यांनी स्वत: काम केले.

- राजकारण कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

- त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती केली.

- भ्रष्टाचार किती घातक आहे, चाणक्यांनी सांगितले.

- राज्यात भ्रष्टाचार शाश्वत आहे, हे त्यांनी सांगितले.

- राजकारणातील घराणेशाहीला पहिला विरोध चाणक्यांनी केला होता.

- चाणक्यांची विदेश नीती समजावून सांगत, शहा म्हणतात, आपल्या राष्ट्राचा विकास, दुसऱ्या राष्ट्राचा क्षय. 

- कामाचे संकलन त्यांनी योग्यप्रकारे केले. 

- त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. त्यामध्ये त्यांनी मीमांसा केली.

- चाणक्यला वाचू शकतो याचे श्रेय पंडित यांना जाते.

- चाणक्य यांच्या विविध पुस्तकांचा आधार. 

- राजकीय नेत्यांचे रहाणीमान साधे असावे. सामान्यांना सहज संपर्क करता येईल, अशी जीवनशैली नेत्यांची असावी. 

- परिवारवादी पक्ष देश चालवू शकत नाहीत, असे अप्रत्यक्षरित्या शहांची काँग्रेसवर टीका केली. 

- मी कोणाचा उल्लेख करीत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: amit shah speech in pune