

Amit Shah Announces UCC Target Before 2029
esakal
Amit Shah Announces UCC Target Before 2029 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समान नागरी संहिता (UCC) बाबत रविवारी मोठी घोषणा केली. २०२९ पूर्वी एनडीएची सत्ता असलेल्या देशातील सर्व २१ राज्यांमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ३० दिवसांच्या ‘सेवा संकल्प’ मोहिमेची माहिती देताना शाह यांनी ही भूमिका मांडली.