लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Amit Shah : छत्तीसगढमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवल्यास आम्ही रेड कार्पेट अंथरून स्वागत करू अशा शब्दात नक्षलवाद्यांनी समर्पण करावं असं आवाहन केलंय.
Home Minister Amit Shah on ending Naxalism and tribal growth

Home Minister Amit Shah on ending Naxalism and tribal growth

Esakal

Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. रविवारी राजधानी रायपूरमध्ये त्यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर एक उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात गुप्त माहिती आणि नक्षलग्रस्त भागात सुरू असलेल्या कामांवर चर्चा केली. बैठकीआधी अमित शहांनी सोशल मीडियावर म्हटलं की, रायपूरमध्ये छत्तीसगढ सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नक्षल विरोधी मोहिमेचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रणनीती, पायाभूत सुविधा वाढवणं, नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी कठोर कारवाई आणि आत्मसमर्पणाच्या नितीचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com