
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात भाजपच्या १३० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. राज्यामध्ये भाजपची सत्ता आली तर आम्ही या गुंडांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात डांबू, असे सूचक वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथील सभेत बोलताना केले.
कोलकता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात भाजपच्या १३० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. राज्यामध्ये भाजपची सत्ता आली तर आम्ही या गुंडांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात डांबू, असे सूचक वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथील सभेत बोलताना केले. राज्याला अम्फान वादळाचा तडाखा बसल्यानंतर केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत पाठविली होती पण यामध्येही गैरव्यवहार करण्यात आला, आता त्यांनाही तुरुंगात डांबण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले.
‘दक्षिण-२४’ परगणा जिल्ह्यामध्ये नामकाहाना येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शहा यांच्या हस्ते यावेळी परिवर्तन यात्रेच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. राज्यामध्ये वादळ आल्यानंतर केंद्राने मोठा निधी पाठविला होती पण तृणमूलच्या गुंडांनी तो खाऊन टाकला. भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि दोषींना तुरुंगांमध्ये डांबण्यात येईल, असे ते म्हणाले. ममता यांचे पुतणे अभिजित बॅनर्जी यांचा उल्लेख करताना अमित शहा यांनी दीदींना केवळ पुतण्याचे कल्याण करण्यातच रस असल्याचा आरोप त्यांनी केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गंगासागरला भेट
अमित शहा यांनी आज गंगासागरला भेट देत आरती केली तसेच साधूसंतांशी देखील संवाद साधला. सत्तेत आल्यानंतर गंगासागराला सर्वांत मोठे तीर्थस्थळ बनवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
नमामी गंगे या योजनेची राज्यामध्ये योग्यरितीने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आमचे सरकार आल्यानंतर त्यात सुधारणा करू असेही शहा यांनी स्पष्ट केले.
Video: उशीरा GST भरणाऱ्यांना दिलासा; FM सीतारमण यांची पुण्यातील शिष्टमंडळाकडून भेट
शहा म्हणाले
सेवाश्रमचे कौतुक
शहा यांनी भारत सेवाश्रम संघाच्या कार्यालयास देखील भेट दिली. आपण लहानपणापासूनच या संघाशी संबंधित आहोत, असे सांगताना शहा यांनी या आश्रमातील लोकांनी सेवेबाबतची जागरूकता वाढविल्याचा दावा केला.
Edited By - Prashant Patil