ममतांचा बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (ता.11) केला. ते कोलकाता येथे एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते. यावेळी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचे सूतोवाच देखील केले. प्रचारसभेला जमलेला जनसमुदाय हेच सूचित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (ता.11) केला. ते कोलकाता येथे एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते. यावेळी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचे सूतोवाच देखील केले. प्रचारसभेला जमलेला जनसमुदाय हेच सूचित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे. ममता बॅनर्जी या आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ममता सरकारचा जनतेला कंटाळा आला आहे. त्या एनआरसीचा विरोध का करत आहेत, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आपण एनआरसीच्या मदतीने बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबवू शकतो. परंतु, ममता बॅनर्जी यांना ते करायचे नसल्याचा आरोपही अमित शहा यांनी यावेळी केला. घुसखोरांचे मतदान जोपर्यंत कम्युनिस्टांना मिळत असे, तोपर्यंत ममता बॅनर्जी घुसखोरांना विरोध करत असत. परंतु, घुसखोरांची मते ममता यांच्या पक्षाला मिळायला सुरवात झाली आणि ममतांचा घुसखोरांना असलेला विरोध कमी झाला. या संदर्भात काँग्रेसही स्पष्ट भुमिका घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शहा म्हणाले की, पहिल्यांदा या प्रचारसभेला थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी, पश्चिम बंगालमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांना बंद करण्यात आल्या, कारण की, या प्रचारसभेचे थेट प्रक्षेपण लोक पाहू शकणार नाहीत. भाजपचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी हे पश्चिम बंगालचेच होते, त्यामुळे भाजप कदापि, पश्चिम बंगालच्या विरोधात असणार नाही. भाजपचा विरोध बंगालला नाहीतर ममतांना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: amit shaha criticise on mamata banerjee