esakal | 'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'
sakal

बोलून बातमी शोधा

Amit shaha

एका वृत्तावाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, काँग्रेसने हा 15 मिनटांत चीनी सैन्याला हटवण्याचा फॉर्म्यूला त्यांनी 1962 मध्ये वापरायला हवा होता.

'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सीमेवर भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी एका मुलाखती दरम्यान काँग्रेसवर टीका केली आहे. 1962मध्ये आपली अनेक हेक्टर्स जमीन चीनने ताब्यात घेतली. काँग्रेस सत्तेवर असती तर 15 मिनिटांत चीनला हुसकावले असते, या राहुल गांधींच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड टीका केली आहे.  सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. आम्ही शेजारी राष्ट्रांसोबत आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे तसेच जेंव्हा केंव्हा आपल्या सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा आम्ही सडेतोड उत्तर दिलं आहे. ही  काही 1962 ची परिस्थिती नाहीये. संबंध सुधारण्याचा प्रयत्न आम्ही पाकिस्तान आणि चीनसोबतही केला आहे. 

हेही वाचा - आक्षेपार्ह वक्तव्यावर कमलनाथ यांचे अजब स्पष्टीकरण; म्हणाले...

राहुल गांधींनी म्हटलं होतं की त्यांच्याकडे 15 मिनिटांचा फॉर्म्यूला आहे तर तुम्ही त्यांच्याकडूनही शिकू शकता या खोचक प्रश्नावर अमित यांनीही खोचक उत्तर दिलं. ते म्हणाले की,  हा 15 मिनटांत चीनी सैन्याला हटवण्याचा फॉर्म्यूला त्यांनी 1962 मध्ये वापरायला हवा होता. जर वापरला असता तर अनेक हेक्टर्स भारतीय जमीन चीनच्या ताब्यात नसती गेली. 'बाय बाय आसाम' असं तेंव्हाच्या पंतप्रधानांनी आकाशवाणीवरुन केंव्हाच म्हणून टाकलं होतं. आणि आता काँग्रेस आम्हाला कसं काय बरं शहाणपण शिकवू शकते? जेंव्हा तुमचे आजोबा सत्तेत होते तेंव्हा आपली मोठ्या प्रमाणावर जमीन चीनच्या घशात गेली होती, असंही त्यांनी म्हटलं.  


ते म्हणाले की, आम्ही आमच्या काळात कमीतकमी रोखठोक उत्तर तर देत आहोत. मला बिहार रेंजिमेंटच्या सैनिकांवर गर्व आहे की त्यांनी हाडे गोठवणाऱ्या थंडीतही आपल्या देशाची सुरक्षा केली आहे. कठोर उत्तर दिलं आहे आणि देशासाठी प्राणदेखील गमावले आहेत. 

हेही वाचा - चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका येणार एकत्र

राहुल गांधी यांनी 7 ऑक्टोबरला हरियाणा-पंजाब भागातील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पत्रकार परिषदेच चीन-भारत सीमा तणावावर आपली भुमिका मांडली  होती. याबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की जर आम्ही सत्तेत असतो तर चीनची हिंमत झाली नसती आपल्या भागात पाय ठेवायची. चीनला हुसकावून लावायला आम्हाला 15 मिनीटदेखील लागले नसते. त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला देश कमकुवत केला आहे, म्हणून तर चीन आपल्या भागात येऊन आपल्या सैनिकांना मारण्याची हिंमत करतो आहे. 

loading image