चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका येणार एकत्र

वृत्तसंस्था
Monday, 19 October 2020

कोरोनाचा प्रसार चीनमधून झाल्यानंतर अनेक देशांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिका आणि चीनचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. शिवाय, भारतासोबत चीनचा सीमेवरून तणाव सुरू आहे.

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रसार चीनमधून झाल्यानंतर अनेक देशांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिका आणि चीनचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. शिवाय, भारतासोबत चीनचा सीमेवरून तणाव सुरू आहे. चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येणार आहेत.

काश्मीरमध्ये बंकर्स उद्धवस्त; जीवंत दहशतवादी ताब्यात

जगभर प्रभाव वाढविण्यासाठी होणारे चीनचे प्रयत्न रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका आता एकत्रित प्रयत्न करणार आहे. चीनचे भारतासोबत सीमेवरून आणि अमेरिकेसोबतव्यापार युद्ध सुरू आहे. जगभर चीन आपला प्रभाव वाढविण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि भारताना सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही देशांदरम्यान BECA (Basic exchange and cooperation agreement) हा करार होणार आहे. या महिन्याच्या शेवटी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क इस्पर भारत भेटीवर होणार आहे. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि संरक्षणंत्री राजनाथ सिंग यांच्या सोबत त्यांची चर्चा होणार असून BECA या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

भारत आणि अमेरिकेतला अशा प्रकारचा हा तिसरा करार आहे. या आधी पायाभूत सुविधा आणि दळणवळण या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी करार झाले होते. लष्करी आणि व्हुरचनात्मक दुष्ट्याही हे करार महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अमेरिका आणि चीनचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोरोना जगभर पसरण्यास चीन हाच जबाबदार असल्याचा आरोप जाहीरपणे केला होता. चीन आणि अमेरिकेने एकमेकांच्या कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

भारतात 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व वाढवण्याचा चीन प्रयत्न करत आहे. हे सगळे प्रयत्न रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असून चीन विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-चीन यांच्यात लडाखमध्ये उद्भवलेल्या सीमा प्रश्नामुळे तणाव आहे. फक्त भारताशीच नाही तर तैवान, जपान, व्हिएतनाम अशा तब्बल 21 देशांशी चीनचा सीमा वाद सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india us expected to sign beca deal during in india trying to stop china influence