शहांचे सहकार मंत्रालय कामाला लागणार

सचिवांची नियुक्ती; मंत्री अमित शहा यांचीही परिषदेला उपस्थिती
amit shaha
amit shahasakal

नवी दिल्ली : आतापर्यंत कागदावर असलेले केंद्रातील सहकार मंत्रालय आता कामाला लागणार असून स्थापनेनंतर तीन महिन्यांनी या खात्याच्या सचिवांची आज नियुक्ती करण्यात आली. तसेच, शनिवारी (ता. २५) दिल्लीत होणाऱ्या सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत सहकार मंत्री अमित शाह हजेरी लावून आपल्या सहभागातून मंत्रालयाच्या कामकाजाचा नारळ फोडतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जुलैमध्ये झालेल्या विस्तारानंतर कृषी मंत्रालयाची विभागणी करून सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले असले तरी, प्रशासकीय व्यवस्था आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. जुलैपासून ते आतापर्यंत आतापर्यंत या खात्याचे सचिवपद हे कृषी मंत्रालयाच्या सचिवांकडेच होते. आता या खात्याच्या सचिवपदी केरळ केडरचे सनदी अधिकारी आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त सचिव देवेंद्रकुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या या परिषदेमध्ये गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह प्रथमच सहकार क्षेत्राशी संवाद साधणार आहेत. नव्या मंत्रालयाबाबत सहकार आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त होणाऱ्या चिंतांवरही सरकारची भूमिका यात मांडली जाणार असल्याचे समजते.

तेल्हारा : पतीच्या अपघाताचा बहाणा करून विवाहितेवर अत्याचार

‘सहकारातून समृद्धी’ हे या परिषदेचे घोषवाक्य असून या परिषदेत साखर, वस्त्रोद्योग, कृषी, मत्स्योत्पादन, बॅंकींग, खत विक्री यासारख्या सर्व क्षेत्रातील सहकारी संघटनांचे दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या परिषदेची संयोजक संस्था असलेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑॅफ इंडियाचे (एनसीयूआय) अध्यक्ष दिलीप संघानी यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांना सहभागासाठी विनंती केली असता त्यांनी संवादासाठी होकार दर्शविला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २५) ही परिषद होत आहे. सहकार मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल राजकीय वर्तुळातून साशंकता व्यक्त होत आहे. याबद्दल विचारले असता दिलीप संघानी म्हणाले की, ‘राजकीय नेत्यांच्या शंकाकुशंका कायम राहतील. लोकांची दिशाभूल करणे त्यांना चांगले कळते. पण सहकार क्षेत्रातील जाणकारांना मात्र काहीही अडचण येणार नाही.’ सहकार मंत्री कशी मदत करतील हे या परिषदेतून स्पष्ट होईलच, अशीही सूचक टिप्पणी संघानी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com