अमित शहांनी धरले रामदेव बाबांचे पाय

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यागगुरु बाबा रामदेव यांची भेट घेतली. ही भेट दिल्लीतील पतंजली आश्रमध्ये झाली. यावेळी अमित शहांनी बाबा रामदेवांचे दर्शन घेतले. यावेळी बाबा रामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची प्रशंसा केली आहे तसेच, सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली -  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यागगुरु बाबा रामदेव यांची भेट घेतली. ही भेट दिल्लीतील पतंजली आश्रमध्ये झाली. यावेळी अमित शहांनी बाबा रामदेवांचे दर्शन घेतले. यावेळी बाबा रामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची प्रशंसा केली आहे तसेच, सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

अमित शहांनी या भेटीदरम्यान सांगितले की, बाबा रामदेव यांनी भेटणे म्हणजे एक करोड लोकांना भेटण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा आराखडाच बाबा रामदेव यांच्यासमोर ठेवला आहे.

या संदर्भात बाबा रामदेव म्हणाले की, उज्ज्वला योजनेने देशातील करोडो महिलांना फायदा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांची नियत आणि नेतृत्वाने देशाचे भले होत आहे. मोदींनी जीएसटी कररचना चालू केल्यामुळे करचोरी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

त्याचबरोबर, मोदी सरकारने योगाला पूर्ण जगात प्रतिष्ठा मिळवून दिली, देशात जीएसटीच्या माध्यमातून एकच कररचना चालू केली. रस्त्यांचे जाळे तयार केले आणि 16000 गावांमध्ये मुलभुत सुविधा पुरविण्याचे काम करण्यात आले आहे. असेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

Web Title: amit shaha visited patanjali ashram in delhi