केजरीवाल यांनी आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी : अमरिंदरसिंग

यूएनआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

पतियाळा येथून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जनरल जे. जे. सिंग यांचा पराभव करून आपण लष्कराचा इतिहास रचू, असे ते म्हणाले. एका कॅप्टनने जनरलचा पराभव करणे, ही एक ऐतिहासिक घटना असेल, असे ते म्हणाले

चंडीगड - पंजाबमध्ये चार फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिले आहे.

पतियाळा येथून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जनरल जे. जे. सिंग यांचा पराभव करून आपण लष्कराचा इतिहास रचू, असे ते म्हणाले. एका कॅप्टनने जनरलचा पराभव करणे, ही एक ऐतिहासिक घटना असेल, असे ते म्हणाले. अकाली दलाचे माजी मंत्री रणजितसिंग बलिअन आणि आपचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदरसिंग बोलत होते.

तिकीट वाटपातील विलंबाचा कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडणूक चार फेब्रुवारीला असल्यामुळे प्रचारास पुरेसा वेळ मिळेल.

Web Title: amrinder singh challenges arvind kejriwal