Amritpal Singh : अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांकडून अटक; सहा साथीदारही ताब्यात | Amritpal Singh Arrested After High-Speed Chase, Internet Shut in Punjab | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amritpal Singh

Amritpal Singh: अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांकडून अटक; सहा साथीदारही ताब्यात

नवी दिल्ली - खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे'चा म्होरक्या अमृतपाल याला पंजाब पोलिसांनी नाकोदरजवळून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी अमृतपालचे 6 साथीदार पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी अमृतपाल पळून गेला होता, त्याच्या शोधात पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या भागात छापे टाकत होती.

पोलिसांनी अटक केलेल्यांकडून शस्त्र आणि 2 वाहने जप्त केली आहेत. रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अमृतपाल सिंह यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन गुन्हे हेट स्पीचशी संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमकोटजवळील महितपूर पोलिस ठाण्याजवळ पोलिसांनी या सहा जणांना अटक केली आहे.

पंजाब सरकारकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, पंजाबच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा 18 मार्च (12:00 तास) ते 19 मार्च (12:00 तास) पर्यंत बंद राहतील.

पोलिसांच्या ५० हून अधिक गाड्या अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांचा पाठलाग करत होत्या. पोलिसांनी अमृतपालच्या वाहनांनाही धडक देण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या लोकेशनच्या आधारे त्याला नाकोदरजवळून ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने बातमी आली होती की, देशद्रोही घटक अमृतपाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत आणि अमृतपाल यांच्यावर हल्ला करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहेत.

टॅग्स :Punjab