Alisha Chinai : ‘मेड इन इंडिया’ फेम अलिशा चिनॉयला कसा मिळाला होता मेड इन इंडिया नवरा? | Made In India Song Fame Singer Alisha Chinai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alisha Chinai

Alisha Chinai : ‘मेड इन इंडिया’ फेम अलिशा चिनॉयला कसा मिळाला होता मेड इन इंडिया नवरा?

Alisha Chinai : आज 18 मार्च मेड इन इंडिया फेम अलिशा चिनॉय या नामवंत सिंगरचा वाढदिवस. 18 मार्च1965 मध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये अलिशाचा जन्म झाला. अलिशाचं खरं नाव सुजाता चिनॉय होतं. या फेमस इंडियन पॉप आणि प्लेबॅक सिंगरचा आवाजच सुंदर नव्हता तर ती सुद्धा तितकीच सुंदर होती.

1985 मध्ये अलिशाचा पहिला अल्बम ‘जादू’ आला मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘मेड इन इंडिया’ (Made in India) या गीतमुळे. आजही हे गाणं ऐकलं की लोकांना अलिशा आठवते. 90 च्या दशकात एकानंतर एक हिट साँग देणारी क्वीन ऑफ इंडीपॉप (Queen of Indipop) नावाने ओळखली जाणारी अलिशा अचानक कुठे गायब झाली? आज आपण तिच्याविषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

‘मेड इन इंडिया’ गाणं हिट झाल्यानंतर अलिशा रातोरात स्टार झाली. अलिशाने त्यानंतर मागे वळून कधीही पाहिले नाही. अलिशाने इतके हिट गाणे दिले की सर्वांच्याच तोंडावर तिचेच नाव होते. 'बंटी और बबली' चित्रपटातील हिट आइटम नंबर 'कजरारे-कजरारे' असो की काटे नहीं कटते, डूबी डूबी, रुक रुक रुक सारखे सुपरहिट गाणे कोण विसरू शकतं.

अलिशा चिनॉयला बप्पी लाहिरीने सर्वात आधी गाण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत तिने अनेक सुपरहिट साँग गायले. 90 च्या दशकात जवळपास सर्व मोठ्या एक्ट्रेसेसलाअलीशाने आपला आवाज दिला. अलीशाने अनु मलिक सोबतही अनेक हिट गाणे दिले. एवढंच काय तर अनेत रिअॅलिटी सिंगिंग शोमध्ये ती अनु मलिकसोबत जजही बनली.

1995 मध्ये अलिशा त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने अनु मलिकवर यौन शोषणचा आरोप लावला. मीडियाच्या रिपोर्टनुसार अलिशाने अनु मलिकवर गुन्हा दाखल केला होता. सोबतच जवळपास 27 लाखाचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता. मात्र अनु मलिकने हे आरोप खोटे सांगत अलिशावरच 2 कोटींच्या मानहानीची केस केली होती.

काही वर्षानंतर अनु आणि अलिशाने आपसी समझोता करुन हा वाद संपविला होता. या वादानंतर जवळपास 6 वर्षानंतर अलिशा चिनॉय आणि अनु मलिकने एकत्र 'इश्क विश्क' चित्रपटासाठी आपला आवाज दिला होता. याशिवाय दोघेही 'इंडियन आइडल' शोमध्ये जज म्हणूनही दिसले.

अलिशा खूप सुंदर आणि तिचा आवाज खूप अप्रतिम होता. अलिशाची पर्सनल लाइफही चढउताराने भरलेली होती. अलीशाने आपला मॅनेजर राजेश झावेरीसोबत 1986 मध्ये लग्न केले मात्र लग्नाच्या 8 वर्षानंतर अलिशा-राजेश 1994 मध्ये वेगळे झाले.

अलिशाच्या वडिलांना कँसर झाला होता. तिने त्यावेळी आपल्या करिअरला सोडून वडिलांकडे लक्ष दिले. त्यानंतर कित्येक वर्षांनी ‘चमकेगा इंडिया’ मधून तीने पुन्हा वापसी केली होती. मात्र ती पहिल्या सारखी एक्टिव नाही. मात्र तिचे लाखो फॅन्स आजही ती पुन्हा एकदा रोलिंग वर येणार, अशी आशा ठेवतात.