लाहोरमधून दिसणार भारताचा 'तिरंगा'

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

पाकिस्तानकडून या झेंड्याबाबत तक्रार केली आहे. हेरगिरीचा हा प्रकार असल्याचे पाकिस्तानकडून म्हणण्यात आले आहे. तर, बीएसएफने पाकिस्तानकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

अमृतसर - भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी येथे रविवारी 360 फूट उंचीवर भारताचा तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला असून, हा झेंडा लाहोरमधून दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशातील सर्वांत उंचीवरील झेंडा असे या झेंड्याबाबत सांगण्यात येत आहे. फ्लॅगमास्ट असे याला नाव देण्यात आले असून, पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी रविवारी याचे उद्घाटन केले. झेंडा उभारण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलओसी) 200 मीटर आतमध्ये भारतीय हद्दीत हा झेंडा उभारण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून या झेंड्याबाबत तक्रार केली आहे. हेरगिरीचा हा प्रकार असल्याचे पाकिस्तानकडून म्हणण्यात आले आहे. तर, बीएसएफने पाकिस्तानकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका निरर्थक असल्याचे म्हटले आहे. 55 टन वजन असलेल्या पोलवर हा झेंडा फडकाविण्यात आला आहे. यापूर्वी रांचीमध्ये 293 फूट उंचीवर भारतीय झेंडा फडकाविण्यात आला होता.

Web Title: amritsar indias tallest tricolour hoisted at attari border it is 360 feet high