

Amul & mother Milk Price Hike
esakal
Amul Milk Rate : सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसत असतानाच आता दूधही महागले आहे. ‘मदर डेअरी’पाठोपाठ ‘अमुल’नेही दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ गुरुवार (१२ नोव्हेंबर) पासून लागू होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख दूध ब्रँडच्या ग्राहकांना आता प्रत्येक लिटरमागे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.