#HowdyModi आनंद महिंद्रा म्हणतात, आता अमेरिकेचा...

टीम ईसकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

देशभरातून नाही, तर जगभरातून या कार्यक्रमाचे कौतुक झाले. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवरून मोदींचे व कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

मुंबई : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम चांगलाच गाजला. देशभरातून नाही, तर जगभरातून या कार्यक्रमाचे कौतुक झाले. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवरून मोदींचे व कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

#HowdyModi : दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याची वेळ : मोदी

'1973मध्ये मी अमेरिकेत शिकायला गेलो होतो, तेव्हा अमेरिकेन लोक भारतीयांना अतिमागास समजत होते. पण आता मला आनंद होतोय की त्यांच्या दृष्टिकोनात बदल होतोय आणि या दोन्ही देशांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले संबंध निर्माण झाले आहेत.' असे ट्विट महिंद्रांनी केले आहे. 

हाऊडी मोदीने पाकिस्तानची हवा गूल; आंदोलन ठरले फ्लॉप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे.' असे ट्विट करत 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचे कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra appreciates Howdy Modi program on tweet