'हाऊडी मोदी'ने पाकिस्तानची हवा गूल; आंदोलन ठरले फ्लॉप

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी समर्थक हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्नात होते. स्टेडियमबाहेर नागरिक फ्रि काश्मीरचे बोर्ड हातात घेऊन उभेही होते. पण, पोलिसांनी त्यांना अडविल्याने त्यांचे आंदोलन फ्लॉप झाले. सत्तारूढ इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाशी संबंधित हे लोक होते.

ह्यूस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमातून दहशतवादाविरोधात लढण्याचे सांगत पाकिस्तानला जोरदार टीका केली. पण, त्याचवेळी पाकिस्तानी नागरिकांकडून स्टेडियमबाहेर होत असलेले आंदोलन मात्र फ्लॉप ठरले. खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांनीच मोदींची स्तुती करत दहशतवादाविरोधात लढण्याचे आश्वासन दिले.

#HowdyModi : दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याची वेळ : मोदी

काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी समर्थक हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्नात होते. स्टेडियमबाहेर नागरिक फ्रि काश्मीरचे बोर्ड हातात घेऊन उभेही होते. पण, पोलिसांनी त्यांना अडविल्याने त्यांचे आंदोलन फ्लॉप झाले. सत्तारूढ इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाशी संबंधित हे लोक होते. त्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडेही होते. काश्मीरी आणि खलिस्तानी शक्तीही कार्यरत झाल्या होत्या. वेगवेगळ्या संघटना आणि गटांमध्ये असलेले हे विरोधक मोदी यांच्याविरोधात आंदोलन करणार होते. पण, त्यांचे आंदोलन प्लॉप ठरले.

#HowdyModi : अमेरिकेत ह्युस्टनमध्ये मोदी आणि फक्त मोदी!

तर, दुसरीकडे भारत सर्व क्षेत्रांत वेगाने विकास करीत आहे. मात्र, ज्या देशांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही, ते भारताच्या यशामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळेच ते दहशतवादाच्या मार्गाने विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असतात, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर आज टीका केली. तसेच, दहशतवादाविरोधात आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले. अमेरिकेतील 9/11, मुंबईतील 26/11 या हल्ल्याचे सूत्रधार कोठे सापडतात? असे म्हणत त्यांनी पाकिस्तानकडे बोट दाखविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Howdy Modi Pakistan Protest outside the venue in Houston US