Video : 100 वर्षांच्या सैनिकाचा कडक सॅल्युट, महिंद्रांच्या अंगावर काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra

Video : 100 वर्षांच्या सैनिकाचा कडक सॅल्युट, महिंद्रांच्या अंगावर काटा

भारतीय सैनिकांची कामगीरी बघून किंवा एखाद्या सैनिकाला गणवेशात बघून आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्या भावना निर्माण होतात. नुकत्याच आलेल्या उरी चित्रपटातील 'हाऊज द जोश' हा डायलॉग ऐकल्यानंतरदेखील प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच जोश निर्माण झालेला आपण सर्वांनी अनुभवला आहे. असाच काहीसा जोश वाढविणारा व्हिडिओ देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रांनी शेअर केला आहे. महिद्रांनी हा व्हिडिओ Monday Motivation असे लिहित शेअर केला आहे.

नुकतेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर सब मेजर स्वामी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी मेजर स्वामी यांनी व्हीलचेअरवरून उठून लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. स्वामी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, वयाच्या शंभरीत व्हिल चेअरवरून उभं होत स्वामी यांनी ही सलामी दिली आहे. स्वामी यांचा हा जोश पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: School Rules : लघुशंकेसाठीही निर्बंध; शाळांमधील अजब नियम एकदा वाचाच

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, "राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर, सब मेजर स्वामी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या 7 जनरल्सना इंस्ट्रक्ट केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या गुरूंचा सन्मान करण्याची भारतीय परंपरेबद्दलही सांगितले. स्वामी यांनी ज्यावेळी व्हिलचेअरवरून उभ राहत सलामी दिली त्यावेळी त्यांचा जोश पाहून माझ्या अंगावर शहारे आले असे म्हणत महिद्रा यांनी #MondayMotivation असे कॅप्शन याला दिले आहे.

हेही वाचा: Liquor : गोव्यातून दारू आणाल तर खबरदार; होणार मोक्कांतर्गत कारवाई

स्वामी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, आतापर्यंत याला हजारो लोकांनी रिट्विट केले आहे. तर, 25 हजारांहून अधिक नागरिकांनी याला लाईक्स देण्याबरोबरच शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. स्वामी यांचा हा जोश खरच स्फूर्ती देणारा असल्याचे अनेक यूजर्सने म्हटले आहे.