School Rules : लघुशंकेसाठीही निर्बंध; शाळांमधील अजब नियम एकदा वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school

School Rules : लघुशंकेसाठीही निर्बंध; शाळांमधील अजब नियम एकदा वाचाच

Most Weird School Rules : प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे शालेय दिवस कधी ना कधी आठवतात. यात शाळेत घालवलेला क्षण न क्षण प्रत्येकाच्या मनात कायम असतो. पण जर, आम्ही तुम्हाला जगातील अशा शाळांबद्दल सांगितले की, ज्यामध्ये मैत्री करण्याला, टाळी बाजवण्याला आणि लघुशंकेला जाण्यासाठी मर्यादा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जगातील शाळांबद्दल आणि तेथील विचित्र नियमांबद्दल माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा: Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने

मैत्रीला परवानगी नाही : ब्रिटनच्या थॉमस स्कूलमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला एकमेकांशी मौत्री करण्याची परवानगी नाहीये. मैत्री तुटण्याच्या धक्क्यातून विद्यार्थ्यांचे रक्षण व्हावे यासाठी असा नियम करण्यात आल्याचे या शाळेचे म्हणणे आहे.

लाल पेन वापरण्यावर बंदी : युकेतील कॉर्नवॉल काउंटी या अकादमीमध्ये लाल पेन वापरण्यास मनाई आहे. लाल रंग नकारात्मक रंग असल्याचे अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे लाल रंगाचा पेन वापरण्यास मनाई आहे. येथे शिक्षकांना दुरुस्त्या आणि नंबर्स लिहिण्यासाठई हिरव्या शाईचा पेन वापरण्यास सांगितले जाते.

हेही वाचा: Liquor : गोव्यातून दारू आणाल तर खबरदार; होणार मोक्कांतर्गत कारवाई

चिनी शाळेत दुपारची झोप : चीनच्या गॉक्सिन क्रमांक 1 प्राथमिक शाळेत मुलांना दुपारी 12.10 ते दुपारी 2 या वेळेत दुपारची झोप घेण्यास सांगितले जाते. दुपारी मुलांना ताजेतवाने वाटावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

रिलेशनशिप बॅन : मुलं-मुली एकमेकांना डेट करणे सामान्य बाब आहे. मात्र, यामुळे अभ्यासात व्यत्यय येतो असे कारण पुढे करत जपानमधील अनेक शाळांमध्ये मुला-मुलींच्या रिलेशनशिपवर बंदी घालण्यात आली आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी हा नियम आहे.

हेही वाचा: Bomb Threat : इराणहून चीनकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, IAF सतर्क

मेकअप करण्यास बंदी : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण मेकअप करतात. यात मुलींची संख्या मोठी आहे. परंतु जपानमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मेकअप करण्याची आणि नखांना नेलपॉलिश करण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांनी सुंदर दिसण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा नियम आहे.

टाळ्या वाजवणे आणि मिठी मारण्यास मनाई : आपल्यापैकी अनेकजण मित्रांना भेटल्यावर एकमेकांना टाळी देतो किंवा गळाभेट घेतो. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनमधील अनेक शाळांमध्ये असे करण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

हेही वाचा: Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

प्रत्येक सेमिस्टरमध्ये तीन वेळा वॉशरूमची परवानगी : शिकागो, यूएसए येथे असलेल्या एव्हरग्रीन पार्क हायस्कूलमधील मुलांना प्रत्येक सेमिस्टरमध्ये तीन वेळाच वॉशरूम वापरण्याची परवानगी आहे. मुलांचा महत्त्वाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हा नियम लागू केल्याचे शाळेचे म्हणणे आहे.