आनंद महिंद्रांच्या ट्विटनंतर इडली आजींना पाहा काय मिळाले?

आनंद महिंद्रांच्या ट्विटनंतर इडली आजींना पाहा काय मिळाले?

कोईम्बतूर : आजच्या काळातही रोज फक्त गरजेपुरता पैसा मिळवणाऱ्या काही व्यक्ती आहेत. कोईम्बतूरच्या ८० वर्षांच्या कमलाथल आजी हे त्याचे एक उदाहरण. त्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या स्वादिष्ट आणि स्वस्त इडलीसाठी. त्या फक्त एक रुपयात एक इडली विकतात. सध्या सोशल मीडियावर त्या इडली आजी नावाने चर्चेत आल्या आहेत.

भारत गॅसने घेतली दखल
गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ कमलाथल आजी इडली विक्रीचे काम करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची आता जगाला ओळख झाली आहे. महिंद्र ग्रुपचे आनंद महिंद्र यांनी त्यांच्याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. चुलीवर इडली, सांबार करणाऱ्या कमलाथल आजींच्या व्हिडिओला हजारो व्हूज मिळाले होते. त्यानंतर कमलाथल आजी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचल्या. आनंद महिंद्रांच्या ट्विटनंतर आता आजीनं गॅसही मिळालाय. आनंद महिंद्रांची ट्विट्स काही दिवसांपासून चर्चेत असतात. त्यांच्या ट्विटची दखल कोईम्बतूरच्या भारत गॅसच्या शाखेने घेतली आणि कमलाथल यांना गॅस कनेक्शन प्रदान केले. त्याचेही ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

आजींचा आनंद कशात?
केवळ एक रुपयात एक इडली विकण्यात आपण काही त्याग करतोय, अशी कमलाथल यांची भावना नाही हे विशेष. अत्यल्प दरात अन्न देण्याचा आनंद मोठा असल्याचे त्या सांगतात. "मी गेली वीस वर्षे हे काम करत आहे आणि पुढे किती काळ करेन याची कल्पना नाही. मी एकटी आहे. इडली विक्रीतून मला रोज दोनशे रुपये मिळतात आणि जगण्यासाठी मला एवढी रक्कम पुरेशी आहे. मी ठरवले असते, तर यापेक्षा जास्त पैसा मिळवू शकले असते; पण मला जास्त पैशांचा मोह नाही,' असे त्या सांगतात. "एक रुपये इडलीवाल्या आजी,' अशीच त्यांची आता ओळख झाली आहे. ग्राहकांना केवळ इडली दिली जात नाही. सोबत चटणी आणि सांबारही मिळते. आजही भल्या पहाटे साडेपाच वाजता कमलाथल आजींचा दिवस सुरू होतो. दुपारपर्यंत त्यांचे काम चालते. त्यातून त्यांना रोज दोनशे रुपयांची कमाई होते आणि ती त्यांना पुरेशी वाटते. साध्या चुलीवर त्या इडल्या तयार करतात. इडलीच्या चवीने समाधान झालेले ग्राहक हीच माझी मोठी कमाई असल्याचे कमलाथल आजी सांगतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com