आमदाराच्या लेकीच्या लग्नाला ४ लाख लोक, पत्रावळ्या हवेत फेकून वाटण्याची वेळ; जेवण हातानेच वाढून घेतलं, प्रचंड गर्दीमुळे गोंधळ

Anant Singh Daughter Wedding बिहारमधील नेते अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या लग्न सोहळ्यासाठी जंगी तयारी करण्यात आली असून पाहुण्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
Anant Singh Daughter Wedding

Anant Singh Daughter Wedding

Esakal

Updated on: 

बिहारच्या मोकामा विधानसभा मतदारसंघातील आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या लग्नातील शाही थाटासोबतच मोठ्या प्रमाणात जेवणही असणार आहे. या जेवणासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीचे व्हिडिओही समोर आले आहेत. जेवणासाठी एवढी गर्दी झाली की संपूर्ण व्यवस्था कोलमडली. लोकांना पत्रावळ्या देण्यासाठी त्या हवेत फेकण्याची वेळ आली. तर काही जणांनी वाढप्यांची वाट न पाहता भांड्यांमधून हातानेच जेवण घेतले.

Loading content, please wait...