अनंतनागमध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

''या परिसरात 3 ते 4 दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीनंतर पहाटेपासून या चकमकीस सुरवात करण्यात आली. या चकमकीत आत्तापर्यंत 3 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पोलिस कर्मचाऱ्याला वीरमरण आले असून, 2 नागरिक जखमी झाले आहेत."

- एस. पी. वैद्य, पोलिस महासंचालक, जम्मू काश्मीर

श्रीनगर : भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा भागात आज (शुक्रवार) सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या चकमकीत लष्कराने या 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या चकमकीत एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाला आहे.

श्रीगुफारा भागात चकमक सुरु होती. या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, दोन नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या चकमकीत पोलिस कर्मचाऱ्याला वीरमरण आले. याबाबत जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले, की ''या परिसरात 3 ते 4 दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीनंतर पहाटेपासून या चकमकीस सुरवात करण्यात आली. या चकमकीत आत्तापर्यंत 3 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पोलिस कर्मचाऱ्याला वीरमरण आले असून, 2 नागरिक जखमी झाले आहेत."

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहिम अधिकच तीव्र करण्यात आली. त्यानंतर आज या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले.

Web Title: In Anantnag Four Terrorists have been died one police Martyr