ज्ञानवापी मशिदीत त्रिशूळ, डमरू, कमळ दिसलं; कोर्टात वकिलांचा दावा I Gyanvapi Masjid Survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gyanvapi Masjid Survey

ज्या ठिकाणी शिवलिंग सापडलं ती जागा सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला होता; पण..

ज्ञानवापी मशिदीत त्रिशूळ, डमरू दिसलं; वकिलांचा दावा

वाराणसीच्या ज्ञानवापीच्या मशिदीला (Varanasi Gyanvapi Masjid) आवाहन देणाऱ्या याचिकेवर सध्या वाराणसी कोर्टात (Varanasi Court) सुनावणी सुरूय. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निर्णयावर हिंदू संघटना आपली बाजू मांडत आहेत. दरम्यान, कोर्ट कमिशनर अजय मिश्रा (Court Commissioner Ajay Mishra) यांना हटवण्यात आलंय. निरीक्षण समितीला निरीक्षण पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता.

वाराणसी जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार की, ज्या ठिकाणी शिवलिंग सापडलं ती जागा सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला होता. पण, मुस्लिमांचा नमाजपठणाच्या अधिकारावर कुठल्याही प्रकारे गदा येऊ नये असंही या आदेशात म्हटलंय. परिस्थिती 'जैसे थे' राहिली पाहिजे. वाराणसी कोर्टानं मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं ऐकावं, अशा सूचना देणार असं न्या. चंद्रचूड यांनी म्हटलंय.

Gyanvapi Masjid Survey

Gyanvapi Masjid Survey

ज्ञानवापी मंदिरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात (Gyanvapi Masjid Survey) मंदिराच्या अनेक खुणा दिसून आल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील अजय मिश्रा (Ajay Mishra) यांनी केलाय. न्यायालयानं या मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मशिदीमध्ये मुर्तींचे तुकडे दिसून आल्याचं मिश्रा यांनी म्हटलंय. मशिदीमध्ये मंदिराचे अवशेष असलेला ढिगारा दिसून आला असून यामध्ये शेषनागाचा फणाही दिसून आल्याचे मिश्रांनी म्हटलंय. हा ढिगारा 500-600 वर्ष जुना असावा, असं मिश्रांचं म्हणणं आहे.

ज्ञानवापी मंदिरात 3 दिवस सर्वेक्षणाचे काम सुरू होते. ज्या पथकानं सर्वेक्षण केलं, त्यात मिश्रा यांचाही समावेश होता. सर्वेक्षणावेळी प्रशासनानं आपल्याला मदत केली नाही आणि अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असा मिश्रा यांनी आरोप केलाय. मशिदीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा केला जात आहे. हिंदू पक्षाची मंडळी मशिदीत शिवलिंग दावा करत असून मुस्लिम पक्षाने हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलंय. ते कारंजं असल्याचं मुस्लिम पक्षाचं म्हणणं आहे. कोर्टानं नेमणूक केलेले विशेष आयुक्त विशाल सिंह यांनीही आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सिंह यांनी त्यांच्या अहवालात सनातन धर्माशी निगडीत बऱ्याच गोष्टी मशिदीत दिसून आल्याचं म्हटलंय. मशिदीच्या तळघरातील भिंतीवर डमरू, कमळ, त्रिशूळ दिसून आल्याचं सिंह यांनी त्यांच्या अहवालात म्हटलंय.

टॅग्स :varanasiajay mishra