esakal | ...आणि बँका म्हणतात मी त्यांचे पैसे देणे लागतो - विजय मल्ल्या
sakal

बोलून बातमी शोधा

vijay mallya

...आणि बँका म्हणतात मी त्यांचे पैसे देणं लागतो - विजय मल्ल्या

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारतातील बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानं नुकतचं एक ट्विट केलंय. या ट्विटमधून त्यानं सूचकपणे आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय. किंगफिशर एअरलाईन्सचं संपूर्ण कर्ज चुकतं झालंय तरीही बँका म्हणतात मी त्यांचे पैसे देणे लागतो, असं त्यानं म्हटलंय. यासाठी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा तपशील त्यानं शेअर केला आहे. (and the Banks say I owe them money says Vijay Mallya aau85)

मल्यानं गुरुवारी संध्याकाळी ६.३७ वाजता हे ट्विट केलं. यामध्ये त्यानं एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी शेअर केली आहे. या बातमीमध्ये IDBI बँकेनं किंगफिशर एअरलाइन्सकडून पूर्ण कर्ज वसूली झाल्याचं म्हटलं आहे. ही बातमी शेअर करताना मल्ल्यानं म्हटलंय "....आणि बँका म्हणतात मी त्यांचे पैसे देणे लागतो"

हेही वाचा: प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश? चर्चांना उधाण

दोनच दिवसांपूर्वी लंडनच्या हायकोर्टानं विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषीत केलं होतं. तसेच त्याच्याकडील थकीत कर्जाची वसूली करण्यासाठी भारतातील बँकांना मल्ल्याची जगभरातील संपत्ती जप्त करण्यास परवानगीही दिली होती. या पार्श्वभूमीवर मल्ल्याकडून अद्याप बँकांची देणी दिली गेलेली नाहीत, असं सांगितलं जात आहे. म्हणूनच कदाचित मल्ल्यानं IDBI बँकेच्या वसूलीच्या स्पष्टीकरणाची बातमी शेअर केली.

हेही वाचा: पेगॅसस प्रकरण सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची शाखा - शिवसेना

विजय मल्ल्या हा भारतातील मोठा उद्योगपती असून मद्यसम्राट म्हणूनही त्याची ओळख आहे. भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियाला ९ हजार कोटींचा गंडा घालून तो लंडनमध्ये पळून गेला आहे. मल्ल्यावर सध्या तिथल्या कोर्टामध्ये खटला सुरु असून भारतानंही त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या कोर्टात धाव घेतली आहे.

loading image
go to top