दिल्ली पाठोपाठ अंदमान-निकोबारमध्येही बसले भूकंपाचे धक्के

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावरील दिगलपूर येथे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. बुधवारी सकाळी 2 वाजून 17 मिनिटांनी हे झटके बसले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 नोंदवण्यात आली आहे.

दिगलीपूर-  गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूंकपाचे सौम्य झटके बसत आहेत. बुधवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावरील दिगलपूर येथे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. बुधवारी सकाळी 2 वाजून 17 मिनिटांनी हे झटके बसले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 नोंदवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने याची माहिती दिली आहे. अंदमान-निकोबारच्या दिगलपूर येथे सकाळी 2.17 मिनिटांनी 4.3 तीव्रतेच्या भूंकपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्र दिगलपूरपासून 110 किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेला होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 पेक्षा अधिक नोंदवण्यात आली असली तरी कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही, असं नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात भूंकपाचे झटके बसत आहेत. मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी आठ वाजून 16 मिनिटांनी 3.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपाचे केंद्र श्रीनगर पासून 14 किलोमीटर होते, अशी माहिती जम्मू काश्मिरच्या आपत्ती प्रबंधन विभागाने दिली होती. याशिवाय दिल्ली-एनसीआर भागात एप्रिल महिन्यापासून सात वेळा भूंकपाचे धक्के बसले आहेत. या भूंकपाची तीव्रता 4 पेक्षा कमी होती. त्यामुळे कोणतेही मोठे संकट ओढवले नाही. मात्र, वारंवार बसणारे भूकंपाचे झटके मोठ्या भूकंपाची चाहूल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दिल्ली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andaman and Nicobar diglipur experience 4.3 magnitude earthquake

Tags
टॉपिकस